Parts of Computer

संगणकाचे विविध भाग (Parts of Computer)

संगणकाचा वापर करताना आपण विविध उपकरणांचा वापर करतो, जसे की कीबोर्ड, माउस, मॉनिटर, प्रिंटर इत्यादी. संगणकाचे विविध भाग (Parts of Computer) मुख्यत्वे दोन गटांत विभागले जाते:

संगणकाचे विविध भाग (Parts of Computer):-

१. हार्डवेअर (Hardware) २. सॉफ्टवेअर (Software)


१. हार्डवेअर (Hardware)

संगणकाचे जे भाग आपल्याला डोळ्यांनी दिसतात किंवा ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, त्यांना ‘हार्डवेअर’ म्हणतात. संगणक प्रणाली चालवण्यासाठी हे भौतिक भाग आवश्यक असतात.

हार्डवेअरचे दोन प्रकार पडतात:

  • इंटरनल हार्डवेअर (Internal Hardware): जे भाग सिस्टिम कॅबिनेटच्या (CPU Box) आत असतात. उदा. मदरबोर्ड, रॅम (RAM), हार्ड ड्राइव्ह, प्रोसेसर इत्यादी.
  • एक्सटर्नल हार्डवेअर (External Hardware): जे भाग सिस्टिम कॅबिनेटच्या बाहेरून जोडलेले असतात. उदा. कीबोर्ड, माउस, मॉनिटर.

२. इनपुट डिव्हाइस (Input Devices)

संगणकाला सूचना देण्यासाठी किंवा डेटा फीड करण्यासाठी ज्या उपकरणांचा वापर होतो, त्यांना ‘इनपुट डिव्हाइस’ म्हणतात.

अ) कीबोर्ड (Keyboard):

हा सर्वाधिक वापरला जाणारा इनपुट डिव्हाइस आहे. याचा वापर मजकूर (Text) किंवा डेटा टाईप करण्यासाठी होतो. याचा आविष्कार क्रिस्टोफर लॅथम शोलेज यांनी केला.

कीबोर्डवरील महत्त्वाच्या कीज (Keys):

  • Enter: खालच्या ओळीवर जाण्यासाठी.
  • Caps Lock: अक्षरे कॅपिटल (लिपी बदलण्यासाठी) करण्यासाठी.
  • Num Lock: अंकी कीपॅड वापरण्यासाठी.
  • Space Bar: दोन शब्दांत जागा सोडण्यासाठी.
  • Back Space: टाईप केलेले अक्षर पुसण्यासाठी.
  • Shift: बटणावरील वरचे चिन्ह टाईप करण्यासाठी.
  • Delete: कर्सरच्या उजवीकडील अक्षर पुसण्यासाठी.

ब) माउस (Mouse):

माउसचा वापर स्क्रीनवरील विविध गोष्टी निवडण्यासाठी (Select) होतो. याचा आविष्कार डगलस सी. एंजेलबर्ट यांनी केला.

माउसची बटणे: १. Left Click: फाईल किंवा मजकूर निवडण्यासाठी. २. Right Click: पर्यायांची (Options) यादी पाहण्यासाठी. ३. Scroll: पेज वर-खाली करण्यासाठी.

माउसचे प्रकार:

  • ऑप्टिकल माउस: प्रकाश किरणांच्या (Light) साहाय्याने चालणारा.
  • मेकॅनिकल माउस: खाली असलेल्या लहान बॉलच्या साहाय्याने चालणारा (आता कमी वापर होतो).
  • वायरलेस माउस: बॅटरीवर चालणारा आणि विना वायर जोडलेला.

क) स्कॅनर (Scanner):

स्कॅनरचा वापर कागदावरील माहिती (Hard Copy) डिजिटल स्वरूपात (Soft Copy) संगणकात साठवण्यासाठी होतो. यामुळे फोटो किंवा कागदपत्रे संगणकात सेव्ह करता येतात.

ड) जॉयस्टिक (Joystick):

याला ‘पॉइंटिंग डिव्हाइस’ म्हणतात. याचा मुख्य वापर संगणकावर गेम्स (Games) खेळण्यासाठी केला जातो.

इ) मायक्रोफोन (Microphone):

हा आवाजाच्या स्वरूपात इनपुट देण्यासाठी वापरला जातो.

फ) टच स्क्रीन (Touch Screen):

यामध्ये वापरकर्ता आपल्या बोटांनी स्क्रीनला स्पर्श करून इनपुट देतो. याचा वापर एटीएम (ATM), मोबाईल आणि बँकांमध्ये होतो.

२. आउटपुट डिव्हाइस (Output Devices)

इनपुट डिव्हाइसद्वारे दिलेल्या सूचनांवर प्रक्रिया (Process) केल्यानंतर, त्याचे परिणाम हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात वापरकर्त्याला देणाऱ्या उपकरणांना ‘आउटपुट डिव्हाइस’ म्हणतात.

१. मॉनिटर (Monitor):

मॉनिटर हे एक महत्त्वाचे आउटपुट डिव्हाइस असून त्याचा वापर माहिती प्रदर्शित करण्यासाठी केला जातो. मॉनिटरच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या माहितीला ‘सॉफ्ट कॉपी’ म्हणतात.

मॉनिटरचे सामान्य प्रकार:

  • सीआरटी (CRT – Cathode Ray Tube): हे जुन्या टीव्हीच्या आकाराचे मॉनिटर असायचे. यांना ठेवण्यासाठी जास्त जागा लागायची आणि ते वीजही जास्त वापरायचे.
  • फ्लॅट-पॅनेल मॉनिटर (Flat Panel): हे सध्या सर्वाधिक वापरले जाणारे मॉनिटर आहेत. यामध्ये मुख्य तीन प्रकार पडतात:
    1. LCD (Liquid Crystal Display)
    2. LED (Light Emitting Diode)
    3. OLED (Organic Light Emitting Diode)

२. प्रिंटर (Printer):

संगणकातील माहिती कागदावर छापण्यासाठी प्रिंटरचा वापर होतो. प्रिंटरद्वारे मिळणाऱ्या आउटपुटला ‘हार्ड कॉपी’ म्हणतात. प्रिंटरची गुणवत्ता (Resolution) DPI (Dots Per Inch) मध्ये मोजली जाते.

  • प्रकार: इंकजेट, लेझर, थर्मल, ३डी प्रिंटर आणि प्लॉटर्स.

३. स्पीकर आणि हेडफोन (Speaker & Headphones):

हे ऑडिओ-आउटपुट डिव्हाइस आहेत. हे संगणकातील माहितीचे रूपांतर आवाजात करतात, जो आपल्याला ऐकू येतो.


३. स्टोरेज डिव्हाइस (Storage Devices)

माहिती साठवून ठेवण्याची क्षमता हे संगणकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. संगणकात माहिती दोन प्रकारे साठवली जाते:

१) प्रायमरी स्टोरेज (Primary Storage):

हे अस्थायी (Temporary) असते. यामध्ये माहिती थोड्या वेळासाठीच साठवली जाते.

  • उदाहरण – रॅम (RAM): सिस्टिम युनिटमध्ये रॅम चिप्स असतात. संगणकावर काम करताना अचानक वीज गेली किंवा संगणक बंद झाला, तर रॅममधील सेव्ह न केलेला डेटा नष्ट होतो. म्हणूनच काम करताना डेटा वारंवार ‘सेव्ह’ करणे आवश्यक असते.

२) सेकंडरी स्टोरेज (Secondary Storage):

हे कायमस्वरूपी (Permanent) असते. यामध्ये साठवलेली माहिती नष्ट होत नाही.

  • उदाहरण – हार्ड डिस्क (Hard Disk): आपण सेव्ह केलेली सर्व माहिती हार्ड डिस्कमध्ये सुरक्षित राहते. संगणक बंद करून पुन्हा चालू केल्यावरही ही माहिती आपल्याला परत मिळते.

२. सॉफ्टवेअर (Software)

संगणकाचे असे प्रोग्राम्स ज्यांच्या मदतीने संगणक चालवला जातो, त्यांना ‘सॉफ्टवेअर’ म्हणतात. सॉफ्टवेअरला आपण स्पर्श करू शकत नाही किंवा डोळ्यांनी पाहू शकत नाही. सॉफ्टवेअरशिवाय संगणक कोणतेही काम करू शकत नाही.

सॉफ्टवेअरचे दोन मुख्य प्रकार आहेत:

  1. सिस्टिम सॉफ्टवेअर (System Software): संगणकाची प्रणाली चालवण्यासाठी आवश्यक (उदा. Windows, Linux).
  2. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर (Application Software): विशिष्ट कामे करण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर (उदा. MS Office, Photoshop).

१. सिस्टिम सॉफ्टवेअर (System Software):

सिस्टिम सॉफ्टवेअरला ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ (Operating System) असेही म्हणतात. उदा. विंडोज (Windows), मॅक ओएस (macOS), लिनक्स (Linux) इत्यादी.

  • ऑपरेटिंग सिस्टिम हा संगणकाचा सर्वात मुख्य सॉफ्टवेअर भाग असतो, ज्याच्या अंतर्गत इतर सर्व सॉफ्टवेअर्स काम करतात.
  • ऑपरेटिंग सिस्टिम ही वापरकर्ता (User) आणि संगणकाचे हार्डवेअरॲप्लिकेशन सॉफ्टवेअर यांच्यामध्ये मध्यस्थ (दुवा) म्हणून काम करते.

२. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर (Application Software):

ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर संगणकावर एखादे विशिष्ट काम करण्यासाठी केला जातो. याला ‘एंड युजर सॉफ्टवेअर’ असेही म्हणतात.

  • हे प्रोग्राम्स विशेषतः वापरकर्त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बनवलेले असतात.
  • उदाहरणे: वर्ड प्रोसेसिंग (MS Word), स्प्रेडशीट (Excel), पॉवरपॉइंट (PowerPoint), इंटरनेट ब्राउझर इत्यादी.

३. युटिलिटीज (Utilities):

युटिलिटी सॉफ्टवेअर संगणकाची दुरुस्ती करण्यासाठी किंवा त्याची कार्यक्षमता (Efficiency) वाढवण्यासाठी मदत करतात.

  • युटिलिटी सॉफ्टवेअरला ‘सर्व्हिस प्रोग्राम्स’ (Service Programs) म्हणूनही ओळखले जाते.
  • हे संगणकाची सुरक्षा आणि देखभाल करण्याचे काम करतात.
  • उदाहरणे: अँटीव्हायरस (Antivirus), फाईल मॅनेजर, डिस्क डीफ्रॅग्मेंटर इत्यादी.

Comments are closed.